logo

आनंदाचा शिधा भंडारदरा येथे सरपंच पांडुरंग खाडे यांच्या हस्ते वाटप अहमदनगर :- गरिबांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशान

आनंदाचा शिधा भंडारदरा येथे सरपंच पांडुरंग खाडे यांच्या हस्ते वाटप

अहमदनगर :- गरिबांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने राज्याकडून ‘आनंदाचा शिधा’ योजनेंतर्गत शंभर रुपयांमध्ये तेल, हरबरा डाळ, साखर, रवा आदी किराणा माल स्वस्त धान्य दुकानातून देण्यात आला. या योजनेचा प्रारंभ आज भंडारदरा येथे स्वस्त धान्य दुकानातून भंडारदरा गावचे सरपंच पांडुरंग खाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सणानिमित्त गरिबांना दिवाळीची भेट देताना शंभर रुपयांमध्ये रास्त धान्य दुकानावर एक किलो साखर, एक किलो त
हरबरा डाळ, एक किलो रवा व तेल असा किराणा माल देऊ केला आहे. गरिबांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने ही योजना राबविण्यात आल
अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्व रास्त धान्य दुकानांवर योजनेचा लाभ मिळत आहे. भंडारदरा येथे अकोले तालुक्यात सर्वात मोठे स्वस्त धान्य दुकानदार भास्कर बुळे यांच्या दुकानातुन या योजनेचा लाभ भंडारदरा गावचे सरपंच पांडुरंग खाडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उपस्थित ग्राहकांनी राज्य सरकार, तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यातील महसूल विभागाचे आभार मानले

30
14661 views
  
1 shares